24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयदुसरी लाट मानवी प्रयत्नांनी रोखणे शक्य नव्हते

दुसरी लाट मानवी प्रयत्नांनी रोखणे शक्य नव्हते

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट मानवी प्रयत्नांनी रोखणे शक्य नव्हते, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. देशात तिसरी लाट येण्याची शंका व्यक्त होत असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातमधल्या एका कार्यक्रमात हे वक्तव्य केले आहे.

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. देशात एका दिवसाला ३ लाखांच्या पुढे आढळणारी कोरोना रुग्णसंख्या आता ५० हजारांच्या आत आली आहे. त्यामुळे निर्बंधामध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. याचदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील कोरोनाच्या दुसºया लाटेबाबत एक महत्वाचे विधान केले आहे.

कोरोनाची दैनंदिन प्रकाशित होणारी आकडेवारी आणि पहिल्या दोन लाटांचे पॅटर्न यांचा तौलनिक अभ्यास केला असता, दुसरी लाट ४ जुलै रोजी सुरु झाली आहे, असे हैद्राबाद विद्यापीठातील प्रसिद्ध अभ्यासक डॉ. बिपीन श्रीवास्तव यांनी म्हटले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जशी परिस्थिती होती, तशीची परिस्थिती जुलैच्या पहिल्या आठवड्यात होती, असे डॉ. श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.

‘स्पुटनिक व्ही’ची पुण्यात निर्मिती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या