27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeमहाराष्ट्रसीरम इन्स्टिट्यूटने कोरोनाची चाचणी थांबविली

सीरम इन्स्टिट्यूटने कोरोनाची चाचणी थांबविली

एकमत ऑनलाईन

पुणे : सीरम इन्स्टिट्यूटने करोना लसीवरील चाचणी थांबवित असल्याचे एका निवेदनाद्वारे जाहीर केले आहे. या निवदेनात म्हटले आहे की, ऍस्ट्रॅजेनेका चाचण्या पुन्हा सुरू होईपर्यंत भारतातील चाचण्या थांबवित आहोत. डीसीजीआयकडून करण्यात आलेल्या सूचनांचे पालन आम्ही करीत आहोत. याबाबत यावर अधिक भाष्य आम्ही करणार नाही. या संदर्भात अधिक माहितीसाठी डीसीजीआयशी संपर्क साधावा, असे आवाहनही कंपनीकडून करण्यात आले.

ब्रिटनमध्ये एका व्यक्तिला ऑक्‍सफर्डने तयार केलेली करोना व्हायरसवरील लस टोचण्यात आल्यानंतर त्याच्या शरारीवर लसीचे दुष्परिणाम दिसून आल्यानंतर या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी थांबवण्यात आली आहे. परंतु, भारतातील चाचण्या सुरुच राहणार असल्याने सीरम इन्स्टिट्यूटने काल सांगितलं होतं. मात्र, आज पुन्हा या चाचण्या थांबवण्यात आल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कंगना वादात आता राज्यपालांची उडी

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या