25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeराष्ट्रीयमहाराष्ट्रातील शिंदे सरकार लवकरच कोसळेल; ममता बॅनर्जींची भविष्यवाणी

महाराष्ट्रातील शिंदे सरकार लवकरच कोसळेल; ममता बॅनर्जींची भविष्यवाणी

एकमत ऑनलाईन

कोलकाता : महाराष्ट्रातील नवे शिंदे सरकार लवकरच कोसळेल अशी भविष्यवाणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्या विधानाचा पुनरुच्चार केला. सोमवारी कोलकात्यातील इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमध्ये त्या बोलत होत्या.

बॅनर्जी म्हणाल्या, मला विश्वास आहे की, हे सरकार पुढे चालणार नाही. कारण हे अनैतिक आणि असंविधानिक सरकार आहे. भलेही सरकार जिंकले असेल पण ते महाराष्ट्राचे मन जिंकू शकत नाही. तुम्ही सत्तेचा गैरवापर करुन लोकशाहीवर बुलडोझर चालवू शकाल पण लोकशाही पद्धतीने लोक तुमच्यावर बुलडोझर चालवतील. त्याचबरोबर ममतांनी आरोप केला की, महाराष्ट्रातील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना आसाममध्ये पैसा आणि इतर गोष्टी भाजपने पुरवल्या आहेत.

घराणेशाहीच्या राजकारणावर वारंवार बोलणा-या भाजपला यावेळी ममतांनी सुनावले. त्या म्हणाल्या, भाजप कुठल्या घराणेशाहीवर बोलत आहे? शेख मुजबिर रहेमान शेख यांच्या मृत्यूनंतर शेख हसीना यांनी बांगलादेशची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. त्यावेळी हे कोण करु शकले असते?

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या