23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeराष्ट्रीयआम्हाला धोका दिला म्हणूनच शिवसेना फोडली

आम्हाला धोका दिला म्हणूनच शिवसेना फोडली

एकमत ऑनलाईन

पाटणा : बिहार भाजपाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांना इशारा देताना महाराष्ट्रात भाजपाने शिवसेना का फोडली याचा मोठा खुलासा केला आहे. पण यामुळे भाजप आरोपीच्या पिंज-यात उभी राहिली आहे. होय. आम्ही शिवसेना फोडली असे म्हणत भाजपने पहिल्यांदाच जाहीर कबुली दिली आहे.

ज्यांनी आम्हाला धोका दिला त्यांना आम्ही तोडले, महाराष्ट्रात शिवसेना भाजपसोबत होती. जेव्हा शिवसेनेने धोका दिला तेव्हा त्यांना त्याचा परिणाम भोगावा लागला असे म्हणत सुशील मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. परंतु मोदी यांच्या या वक्तव्यानंतर भाजप मित्र पक्षांना संपवतो का? असा प्रश्न विचारला जातोय? बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी भाजपवर अनेक आरोप करत एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यावर सुशील मोदी यांनी महाराष्ट्र आणि शिवसेनेचे उदाहरण दिले. त्यांनी म्हटले की आम्ही कोणताही मित्रपक्ष तोडत नाही. ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांना आम्ही तोडले आहे. जसे की महाराष्ट्र. महाराष्ट्रात शिवसेनेने आमचा विश्वासघात केला आणि त्याचे परिणाम भोगावे लागले.

मोदी-शहांमुळे एकहाती सत्ता
राज्यात १९८० पासून भाजप आणि शिवसेना हातात हात घालून मोठी झाली, पण २०१४ साली युती तुटली आणि दुरावा वाढत गेला. पण राज्यात कुणी कुणाला संपवले यावरून कायम आरोप प्रत्यारोप होत राहिले. केंद्रात मोदी आणि शहा यांचा उदय झाला तेव्हापासून भाजपची एक हाती सत्ता आली आहे, अंकाच्या खेळात भाजपला मित्र पक्षांची गरज उरली नाही, त्यामुळे त्यांना दुय्यम स्थान मिळत गेले, आता मात्र मित्रपक्ष संपवले जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अनेक राज्यात भाजपपासून छोटे पक्ष दुरावले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या