तिरुवनंतपुरम : देशात पुन्हा होत असलेली कोरोनारुग्णवाढ पाहता अनेक जण दुसरी लाट आल्याची भीती व्यक्त करीत आहेत. अशातच सीएसआयआरचे महासंचालक शेखर सी. मांडे यांनी भारताला अधिक सावध केले आहे. सध्या होणाºया रुग्णवाढीच्या वेगाकडे पाहता भारतात कोरोनाची तिसरी लाट आली तर परिस्थिती खूपच गंभीर होईल, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
तिरुअनंतपुरममध्ये राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजीकडून आयोजित केलेल्या कार्यक्रमात मांडे बोलत होते. कोविड-१९ आणि भारताच्या उपाययोजना या विषयावर बोलताना मांडे यांनी भारतात अद्यापही सामुहिक प्रतिकार क्षमता (हर्ड इम्युनिटी) निर्माण झालेली नाही. अशा परिस्थितीत पुन्हा रुग्णवाढ होत आहे. अशातच तिसरी लाट येणे फारच घातक ठरेल, अशी भीती व्यक्त केली. सध्या तर केवळ विषाणू संसर्गापासून वाचण्यासाठी मास्कचा वापर हाच सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे सांगितले. सांगत सोशल डिस्टन्सिंग तसेच हातांच्या स्वच्छतेसारख्या उपायांचाही अवलंब करण्याचे आवाहन केले.
भारतीय लसी सर्वच स्ट्रेनवर प्रभावी
मांडे यांना यावेळी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर भारतीय लसी कितपत प्रभावी आहेत,असाही प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी भारतीय लसी या कोरोनाच्या मुळ प्रथिनावरच काम करीत असल्याने त्या सर्वच स्ट्रेनवर तितक्याच प्रभावी असल्याचे सांगितले. मात्र लसीनंतरही सर्व सुरक्षिततेचे उपाय अवलंबणे हे तितकेच महत्त्वाचे असल्याचेही नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी घेतली कोरोना लस