24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeराष्ट्रीययूपीत योगींचा पुन्हा येईनचा नारा

यूपीत योगींचा पुन्हा येईनचा नारा

एकमत ऑनलाईन

लखनो : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ च्या निमित्ताने राजकीय रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण देशाचे या निवडणुकांकडे लक्ष असतानाच आता विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मी पुन्हा येईनचा नारा दिला आहे. गेल्या ३५ वर्षांत उत्तर प्रदेशात एकही मुख्यमंत्री सलग दुस-यांदा जिंकून आलेला नाही. मात्र, येत्या निवडणुकीत मी राज्यातील ही प्रथा मोडून दाखवेन आणि पुन्हा सत्तेत येईन असा मोठा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे.

नवभारत नवनिर्माण मंच-उत्तर प्रदेशमध्ये बोलताना योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले की, सध्याच्या कलांनुसार भाजपाला ३५० पेक्षा कमी जागा मिळणार नाहीत. पक्ष विकास आणि राष्ट्रवादाच्या अजेंड्यावर ही निवडणूक लढेल. याचसोबत, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ४०० जागा जिंकण्याच्या केलेल्या विधानावर देखील योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अखिलेश यादव यांना मोजता नाही. खरंतर सर्वेक्षण संघाने त्यांना असे सांगितले असेल की, सपा ४०० जागांवर मागे असेल. पण त्यांनी चुकीची माहिती दिली. शेवटी, सत्तेवर कोण येणार आहे हे त्यांनाही माहित आहे, असा टोलाही योगी आदित्यनाथ यांनी लगावला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या