28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयपहिल्या उड्डाणासाठी गगनयान सज्ज

पहिल्या उड्डाणासाठी गगनयान सज्ज

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मानवाला अंतराळात पाठविण्याचे भारताचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कारण गगनयान पहिल्या उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी याबाबतची माहिती दिली आहे. एका कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना यांनी याबाबत माहिती दिली. भारताच्या स्वातंत्र्यांच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त सरकारने २०२२ या वर्षासाठी मानवी अंतराळ उड्डाणाची योजना आखली होती. परंतु, कोरोना महामारीमुळे या मोहिमेच्या वेळापत्रकात बदल झाला. परंतु, लवकरच भारताचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे मंत्री सिंह यांनी म्हटले आहे.

गगनयानची पहिली चाचणी या वर्षाच्या शेवटी होणार आहे. पहिल्या चाचणी उड्डाणानंतर अंतराळातील व्योम मित्रा हा ुमनॉइड रोबोट पुढील वर्षी बा अवकाशात पाठवला जाईल, अशी माहिती सिंह यांनी दिली. भारतीय हवाई दलाने मानवयुक्त अंतराळ उड्डाण मोहिमेसाठी संभाव्य चालक म्हणून चार लढाऊ वैमानिकांची निवड केली होती. या वैमानिकांनी रशियामध्ये मूलभूत प्रशिक्षण घेतले होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था दोन कक्षीय चाचणी उड्डाणांच्या परिणामांचे मूल्यांकन केल्यानंतर २०२४ मध्ये दोन अंतराळवीरांना पृथ्वीच्या कक्षेबाहेर पाठवले जाईल, अशी माहिती मंत्री सिंह यांनी दिली आहे.

१०००० कोटींची मोहीम
चाचणी मोहिमेदरम्यान अंतराळयान १५ किमी उंचीवर प्रक्षेपित केले जाईल. त्यावेळी शास्त्रज्ञ पॅराशूट वापरून क्रू कॅप्सूल पृथ्वीवर परत येण्याची खात्री करण्यासाठी परिस्थितीची पाहणी करतील. अशी माहिती अधिक-यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दहा हजार कोटी रूपयांच्या या अंतराळ मोहिमेची घोषणा केली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या