22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeराष्ट्रीयतृणमूल कॉँग्रेसची अवस्था शिवसेनेसारखी होणार!

तृणमूल कॉँग्रेसची अवस्था शिवसेनेसारखी होणार!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांनी दावा केला की, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉँग्रेस पक्षाला शिवसेनेसारख्याच परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. ममता बॅनर्जींचा कार्यकाळ संपण्यापूर्वी महाराष्ट्रासारखी परिस्थिती निर्माण होईल. झारखंड आणि राजस्थान या बिगरभाजप राज्याचीही तीच अवस्था होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूल कॉँग्रेसच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. कूचबिहार जिल्ह्यात एका रॅलीला संबोधित करताना सुवेंदू अधिकारी म्हणाले, आधी महाराष्ट्रातील ही परिस्थिती दूर होऊ द्या. मग, झारखंड आणि राजस्थानची पाळी येईल. त्यानंतर पश्चिम बंगालचा क्रमांक येणार आहे. इतर विरोधी सत्ता असलेल्या राज्यांसारखीच परिस्थिती असणार असून हे सरकार २०२६ पर्यंत चालणार नाही तर सरकार २०२४ पर्यंत पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तृणमूल कॉँग्रेसचे वरिष्ठ खासदार आणि पक्षाचे मुख्य प्रवक्ते सुखेंदू शेखर म्हणाले, सुवेंदू अधिकारींच्या वक्तव्यावरून स्पष्टपणे दिसून येते की, भाजपने महाराष्ट्राला संकटात टाकले.
——————-

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या