22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीयनव-याचा ताडाच्या झाडावर मुक्काम

नव-याचा ताडाच्या झाडावर मुक्काम

एकमत ऑनलाईन

पाटणा : नवरा बायको म्हटले की रुसवे फुगवे आले. अनेकदा नवरा बायकोची भांडणे चर्चेचा विषयही ठरतात. सध्या असेच एक प्रकरण उघडकीस आले आहे. बायकोच्या सततच्या भांडणाला कंटाळून नव-याने असे काही केले की तुम्हीही वाचून अवाक् व्हाल. होय नव-याने बायकोच्या भांडणाला कंटाळून ताडाच्या झाडावर मुक्काम ठोकला.

हे प्रकरण उत्तर प्रदेश येथील असून सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आपण हे बायकोच्या रोजच्या भांडणाला कंटाळून केल्याचे तो म्हणतो. उत्तर प्रदेशच्या मऊ जिल्ह्यात राहणा-या राम प्रवेश यांचे सतत त्यांच्या पत्नीशी भांडण व्हायचे. या भांडणातून सुटका म्हणून तसेच भांडणांपासून कंटाळून त्यांनी चक्क झाडावर राहण्याचा निर्णय घेतला. तो गावात असणा-या ताडाच्या झाडावर राहतो.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या