24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयगंगेच्या आरोग्यासाठी डॉल्फिनचा अभ्यास

गंगेच्या आरोग्यासाठी डॉल्फिनचा अभ्यास

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : उत्तर भारताची जीवनवाहिनी समजल्या जाणा-या गंगा नदीमधील प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या नदीचे आरोग्य तपासण्यासाठी आता डॉल्फिन आणि हिल्सा या दोन प्रजातीच्या माशांच्या जीवनचक्राचा अभ्यास केला जाणार आहे.

‘नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा’ (एनएमसीजी) आणि कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च- नॅशनल एन्व्हायरोन्मेंट इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्था मिळून हा अभ्यास करणार आहेत.

एनएमसीजीचे संचालक जी. अशोक कुमार यांनी ही माहिती दिली. गंगेतील जलचरांच्या जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ‘सेंट्रल इनलॅँड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या पुढाकाराने शोध प्रकल्प राबविला जात आहे. गंगेतील डॉल्फिन, मगरी, कासव आणि पक्षी यांची संख्या कशी वाढेल याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या