26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयराहुल गांधींविरोधातील खटला सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलला

राहुल गांधींविरोधातील खटला सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधातील मानहानीच्या खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे. आता हे प्रकरण ८ सप्टेंबरला सुनावणीसाठी घेतले जाणार आहे. राहुल गांधी यांच्या २०१४ मधील भाषणाचा उतारा त्यांच्याविरुद्धच्या गुन्हेगारी मानहानीच्या खटल्यात पुरावा म्हणून ग्रा धरण्याची मागणी फेटाळण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला याचिकाकर्त्याने आव्हान दिले आहे.

२० सप्टेंबर २०२१ रोजी, मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) पदाधिकारी राजेश कुंटे यांची याचिका फेटाळून लावली, ज्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या २०१४ मधील भाषणाचा उतारा त्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी मानहानीच्या खटल्यात पुरावा म्हणून होता. या भाषणात त्यांनी महात्मा गांधींच्या हत्येसाठी आरएसएस जबाबदार असल्याचं म्हटलं होतं.

सप्टेंबर २०१८ मध्ये भिवंडी दंडाधिकारी न्यायालयाने दिलेल्या आदेशाला आव्हान देत कुंटे यांनी २०१९ मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र असे आरोपपत्र पुरावा म्हणून स्वीकारण्याची विनंती दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळली होती. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या एकल खंडपीठाने कुंटे यांची याचिका फेटाळून लावली. या भाषणावरून कुंटे यांनी २०१४ मध्ये राहुल गांधी यांच्यावर फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता.

कुंटे यांच्या याचिकेनुसार, गांधींनी ६ मार्च २०१४ रोजी भिवंडीतील निवडणूक रॅलीत भाषण केले होते जिथे त्यांनी कथितपणे म्हटले होते की महात्मा गांधींची हत्या आरएसएसच्या लोकांनी केली होती. यानंतर संघाच्या भिवंडी विभागाचे सचिव कुंटे यांनी राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल केला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या