29.5 C
Latur
Tuesday, March 28, 2023
Homeराष्ट्रीयप्राचीन ठिकाणांची नाव बदलण्यावरून सर्वोच्च न्यायालय भडकले

प्राचीन ठिकाणांची नाव बदलण्यावरून सर्वोच्च न्यायालय भडकले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतातील प्राचीन ठिकाणांची नाव बदलण्यासाठी अ‍ॅड. अश्विनी उपाध्याय यांनी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. यासाठी विशेष पॅनल नेमण्याची मागणीही त्यांनी याद्वारे केली आहे. ही याचिका सुप्रीम कोर्टाने सोमवारी फेटाळून लावली. तसेच याचिकाकर्त्यांना कोर्टाने चांगलेच झापले. तुम्हाला देश धगधगत ठेवायचाय का? असा सवाल कोर्टाने केला आहे.

न्या. के. एम. जोसेफ आणि न्या. बी. व्ही. नागरत्न या याचिकेच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी म्हटले की, याद्वारे त्या गोष्टी उकरुन काढण्याचा प्रयत्न होतोय ज्यामुळे देश धगधगत राहिले. भारत हा इतिहासात कैद होऊ शकत नाही असेही कोर्टाने यावेळी टिप्पणी करताना म्हटले. हे सत्य आहे की, आपल्या देशावर परदेशी शक्तींनी आक्रमणे केली आणि राज्य केले. त्यामुळे आपल्या इतिहासातील हा निवडक भाग आपण नाहीसा करु शकत नाही असेही खंडपीठाने सुनावणीदरम्यान म्हटले.

हिंदूू हा धर्म नाही तर जीवन जगण्याचा मार्ग
सुप्रीम कोर्टाने पुढे असेही म्हटले की, भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. तसेच हिंदू हा धर्म नाही तर तो जगण्याचा मार्ग आहे. याने सर्वकाही आत्मसात केले आहे. त्यात कट्टरता नाही. भूतकाळ खोदल्याने केवळ विसंगती दिसून येईल याद्वारे वर्तमान आणि भावी पिढ्यांना त्रास देऊ नये असेही खंडपीठाने यावेळी म्हटले.

याचिकेत काय म्हटले?
अ‍ॅड. अश्विनी उपाध्याय यांनी याचिकेत म्हटले की, मुघल गार्डनचे नुकतेच अमृत उद्यान असे नामकरण करण्यात आले. पण सरकारने रस्त्यांची नाव बदलेली नाहीत. आक्रमकणकर्त्यांची ही नावे कायम ठेवणे हे देशाचे सार्वभौमत्व आणि राज्यघटनेने दिलेल्या इतर नागरी हक्कांच्या विरोधात आहे असा दावाही या जनहित याचिकेतून करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या