24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयनितीश कुमार मंत्रीमंडळाचा शपथविधी पडला पार

नितीश कुमार मंत्रीमंडळाचा शपथविधी पडला पार

एकमत ऑनलाईन

पाटना : नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. जेडीयू, आरजेडी, काँग्रेस आणि हिंदुस्थान अवाम मोर्चाचे (एचयूएम) ३० हून अधिक आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले नाहीयत.

आरजेडीकडून १६ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतील. जेडीयूचे ११ आमदार तर काँग्रेसचे दोन, हिंदुस्थान अवामचा एक आणि एक अपक्ष आमदार मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल फागू चौहान सर्व नवीन मंर्त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिलीय. विभागांचे विभाजनही आज होण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम विजय चौधरी, बिजेंद्र प्रसाद यादव, तेज प्रताप यादव, अफाक आलम आणि आलोक मेहता यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल चौहान यांनी पाच जणांना एकत्र पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधीच्या दुस-या फेरीत अशोक चौधरी, जेडीयूचे श्रवण कुमार, आरजेडीचे रामानंद यादव, सुरेंद्र कुमार यादव आणि लेशी सिंह यांना राज्यपालांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. श्रवण कुमार हे नितीश कुमार यांच्या कुर्मी जातीतील आहेत. त्याच वेळी अशोक चौधरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिले आहेत आणि नंतर ते जेडीयूमध्ये दाखल झाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या