23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeराष्ट्रीयकठोर पावले उचलल्यास तिसरी लाट रोखता येईल

कठोर पावले उचलल्यास तिसरी लाट रोखता येईल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात तिसरी लाट येण्याबाबतचा इशारा केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी या अगोदरच दिला होता. त्यामुळे देशभरातून याबाबत चिंता व्यक्त केली जात असून, सरकारी आणि प्रशासकीय पातळीवर याबाबत हालचालीही सुरू झाल्या आहेत. दरम्यान, राघवन यांनी आज याबाबत उपायदेखील सांगितला असून, जर आपण कठोर पावले उचलली, तर तिसरी लाट कदाचित कुठेच येणार नाही. त्यासाठी स्थानिक, राज्य, जिल्हा आणि शहर पातळीवर कोरोनाबाबतचे नियम किती प्रभावीपणे अंमलात आणतो, यावर सर्व काही अवलंबून आहे, असे म्हटले आहे.

आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत के. विजय राघवन यांनी ही भूमिका मांडली. त्यामुळे केंद्र सरकार आणि देशभरातील राज्य सरकारांसाठी ही महत्त्वाची बाब ठरली आहे. देशभरात कोरोनाच्या दुस-या लाटेचा जबरदस्त तडाखा बसल्याचे दिसत आहे. रोज आढळणा-या नव्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असताना मृतांचा आकडादेखील नियंत्रणात आणण्यात अद्याप अपयश आलेले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचे विधान बुधवारी केले होते. त्यामुळे चिंता वाढली होती. मात्र, राघवन यांनी कोरोनाची तिसरी लाट रोखण्याचा मार्ग सांगितल्याने आता केंद्र आणि राज्य सरकारांना त्याचा विचार करावा लागणार आहे.

जर आपण कठोर पावले उचलली, तर तिसरी लाट कदाचित कुठेच येणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक असल्याचे सांगतानाच या नियमांची स्थानिक पातळीवर प्रभावी अंमलबजावणी करणेदेखील आवश्यक आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. या अगोदर त्यांनी तिस-या लाटेसाठी तयार राहायला हवे, असा इशारा दिला होता. एवढेच नव्हे, तर याचा धोका लहान मुलांना असणार आहे, असे म्हटले होते. त्यामुळे देशवासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.

प्रायव्हसी पॉलिसीसाठी १५ मे ची डेडलाईन रद्द!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या