24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयफुटपाथवर झोपलेल्यांना ट्रकने चिरडले

फुटपाथवर झोपलेल्यांना ट्रकने चिरडले

एकमत ऑनलाईन

हरियाणा : हरियाणाच्या झज्जरमधून एक हृदयद्रावक अपघाताची बातमी समोर आली आहे. जिथे एका ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या लोकांना चिरडले आहे. यामध्ये तीन मजुरांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. झज्जर जिल्ह्यातील टोल प्लाझासमोर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

समोर आलेल्या वृत्तानुसार, ट्रक चालकाचे अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर तो रस्त्यावरून फुटपाथवर गेला. या फुटपाथवर अनेक मजूर झोपले होते, त्यांना ट्रकने चिरडले. या मजुरांना चिरडत ट्रक पुढे सरकला आणि नंतर उलटला. जखमी झालेल्या ११ जणांपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महामार्गावरील दुरुस्तीचे काम करणारे मजूर
कुंडली-मानेसर-पलवल एक्स्प्रेस वेवर ही वेदनादायक दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले. समोर आलेल्या माहितीनुसार, १० जखमींना पीजीआय रोहतकमध्ये पाठवण्यात आले आहे, तर एका जखमी मजुराला बहादुरगडमधील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सर्व मृत आणि जखमी मजूर या एक्स्प्रेस वेवर दुरुस्तीचे काम करत होते. काम संपल्यावर सर्वजण थकून रस्त्याच्या कडेला झोपले. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या