26.9 C
Latur
Monday, July 4, 2022
Homeराष्ट्रीयसत्य गजाआड करता येणार नाही

सत्य गजाआड करता येणार नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेस समर्थक आमदार जिग्नेश मेवानी यांना आसाम पोलिसांनी केलेल्या अटकेवरून काँग्रेसने ‘हुकूमशहा घाबरला’ अशी खवचट प्रतिक्रिया व्यक्त केली. तर काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले असून सत्य गजाआड करता येणार नाही, असा इशारा दिला. मेवानी यांनी मोदींच्या विरोधात केलेल्या ट्विटच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या तक्रारीच्या आधारे आसाममधील कोक्राझार जिल्ह्यातील पोलिसांनी आज पहाटे मेवानी यांना गुजरातमधून अटक केली.

यामुळे संतप्त झालेल्या राहुल गांधींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान करणारे ट्विट केले. मोदीजी, तुम्ही सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून विरोधाचा आवाज दपडण्याचा प्रयत्न करू शकता. परंतु तुम्ही कधीही सत्याला तुरुंगात डांबू शकत नाही, असा हल्ला ट्विटद्वारे चढवला. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकारांशी बोलताना हुकूमशहा घाबरला, अशी खिल्ली उडविली. पोलिसांनी मध्यरात्री गुजरातच्या पालनपूर येथून आमदार जिग्नेश मेवानी यांना अटक करणे, हेच घाबरल्याचे चिन्ह आहे, असा टोला सुरजेवाला यांनी लगावला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या