24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयबोगदा कोसळला, १० जण ढिगा-याखाली

बोगदा कोसळला, १० जण ढिगा-याखाली

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : मागील काही महिन्यांपासून जम्मू-श्रीनगर महामार्गावरील एका बोगद्याचे काम सुरू आहे. काम सुरू असतानाच येथे मोठी दुर्घटना घडली. मेकरकोट परिसरातील खुनी नाला येथे बोगद्याचा काही भाग कोसळला. येथे जवळपास १३ जण ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

बचाव मोहिमेदरम्यान ३ जणांची सुटका करण्यात आली असून १० जण अजूनही बोगद्यात अडकले आहेत. अधिका-यानी सांगितले की, बोगद्यात अडकलेले लोक बोगद्याचे ऑडिट करणा-या कंपनीचे कर्मचारी आहेत. बनिहालहून घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या