श्रीनगर : सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी जम्मू-काश्मीरमधील हीरानगर सेक्टरमधील पानसर येथे एक बोगदा शोधून काढला आहे. दहा दिवसांच्या आत सीमेवर आढळलेला हा दुसरा बोगदा आहे. बीएसएफच्या अधिका-यांकडून दिलेल्या माहितीनूसार बोगद्याची लांबी १५० मीटर लांब आहे. दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी पाकिस्तानी गुप्तचर विभागाकडून या बोगद्याची निर्मिती करण्यात आली होती, असेही सांगण्यात येत आहे. दहा दिवसांच्या आत सीमेवर आढळलेला हा दुसरा बोगदा आहे. बीपी नंबर १४ व १५ दरम्यान हा बोगदा आढळला आहे. हा बोगदा जवळपास १५० मीटर लांब व ३० फूट खोल आहे. सुरक्षा यंत्रणा याबाबत अधिक तपास करत आहे.
६ महिन्यात चौथी घटना
बीएसएफने जून २०२० मध्ये याच भागात शस्त्रे आणि स्फोटके घेऊन जाणारे एक पाकिस्तानी हेक्साकॉप्टरला पाडले होते. जवानांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये याच क्षेत्रातील घुसखोरीचा प्रयत्नदेखील हाणून पाडला होता. लष्करी अधिका-यांचे म्हणणे आहे की, आतापर्यंत जम्मू परिसरात दहाव्यांदा आणि मागील सहा महिन्यांमध्ये चौथ्यांदा बोगदा आढळून आला आहे.