24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयट्विन टॉवर पापणी लवण्याआधी झाले जमीनदोस्त

ट्विन टॉवर पापणी लवण्याआधी झाले जमीनदोस्त

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आज नोएडातील अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर पाडण्यात आले आहे. एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचे काम देण्यात आले होते. हे ट्विन टॉवर पाडण्यासाठी ४६ जणांची टीम काम करत होती. ही टीम दररोज सुमारे १२ तास स्फोटके लावण्याचे काम करत होती. स्फोटकांच्या मदतीने अवघ्या तीन मिनिटांत एपेक्स आणि सायन नावाचे दोन टॉवर जमीनदोस्त झाले आहेत. जमीनदोस्त होणारी देशातील ही पहिली उंच इमारत आहे.

बांधकाम पाडण्यासाठी ३५००0 किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला आहे. यासंदर्भात सुरक्षा व्यवस्थाही मजबूत करण्यात आली आहे. जवळपासचे निवासी भाग रिकामे करण्यात आले आहेत. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस, सुरक्षा कर्मचारी, बचाव पथक, अग्निपथक तैनात करण्यात आले आहे.

टॉवर पाडण्याची तारीख २२ मे २०२२ निश्चित करण्यात आली होती, परंतु तयारी पूर्ण झाली नसल्याचे नमूद करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने संबंधित यंत्रणांना वेळ दिला. यानंतर २२ ते २८ ऑगस्ट दरम्यान टॉवर तोडण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, यावेळीही टॉवर पाडण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती, मात्र संबंधित यंत्रणेने प्राधिकरणाला पत्र देऊन ट्विन टॉवर कमकुवत झाल्यामुळे धोक्याची भीती व्यक्त करत २८ तारखेपर्यंत तो पाडण्याची सूचना केली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या