30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeराष्ट्रीयमध्यप्रदेशात कोरोना मृत्यू लपवण्याचा प्रकार?

मध्यप्रदेशात कोरोना मृत्यू लपवण्याचा प्रकार?

एकमत ऑनलाईन

भोपाळ : महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी अगदी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही महाराष्ट्रावर आगपाखड केली. त्याविरोधात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनीही भाजपशासित राज्यांतही संसर्ग मोठा असल्याचा दावा केला होता. संबंधित सरकारे माहिती लपवित असल्याचा आरोपही केला होता. सुरुवातीला हे नुसते आरोप-प्रत्यारोप वाटत होते. मात्र आता भोपाळमधील घटनेने संशय बळावला आहे. भोपाळमध्ये गेल्या ३ दिवसांत कोरोना प्रोटोकॉलनूसार १८७ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून प्रत्यक्षात रेकॉर्डवर मात्र केवळ ५ मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे लिहिले आहे.

मध्यप्रदेश सरकारने जारी केलेल्या आकडेवारीत सोमवारी राज्यात ३५ कोरोना मृत्यू झाले. मात्र एकट्या भोपाळमध्ये त्यादिवशी तब्बल १८७ मृतदेहांवर कोरोना प्रोटोकॉलनूसार अंत्यसंस्कार झाल्याचे उघड झाले आहे. सरकारने दाखवलेल्या आकडेवारीतील तफावतीमुळे विरोधी पक्ष काँग्रेसने सरकारवर टीका सुरु केली आहे. मात्र मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याबाबत नकार दिला असून कोरोना संशयित रुग्णांचे मृत्यू व कोरोनामुळे झालेले मृत्यू दोन्हींचेही अंत्यसंस्कार कोरोना प्रोटोकॉलनुसारच केल्याने आकडा वाढल्याचे सांगितले आहे. मात्र हा केवळ शाब्दच्छल वाटत आहे.

आगामी ५ वर्षात भारत-पाकिस्तानमध्ये मोठे युद्ध; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा अहवाल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या