26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयदेशात बेरोजगारीची टक्केवारी ८.३ वर

देशात बेरोजगारीची टक्केवारी ८.३ वर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील बेरोजगारीचा दर ऑगस्ट महिन्यामध्ये ८.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. या मागच्या महिन्याच्या तुलनेत रोजगार २० लाखांनी घटून तो ३९.४६ कोटींवर आला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी(सीएमआयई)ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये बेरोजगारीचा दर ६.८ टक्के होता तर, रोजगार ३९७ दशलक्ष इतका होता.

सीएमआयईचे व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरी बेरोजगारीचा दर सामान्यत: ग्रामीण बेरोजगारीच्या दरापेक्षा जास्त आहे, यावेळी शहरी बेरोजगारीचे प्रमाण ८ टक्के, तर ग्रामीण बेरोजगारीचा दर सुमारे ७ टक्के इतका झाला आहे. एकीकडे भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे. भारताने ब्रिटनला मागे टाकून जगात ५ नंबरचे स्थान मिळवले आहे.

त्याचवेळी अर्थव्यवस्थेसमोर मंदी, बेरोजगारी, उद्योग- धंदे, कर्ज दरातील वाढ अशा एक ना अनेक संकटे देशासमोर उभी राहिली आहे. ऑगस्टमध्ये, शहरातील बेरोजगारीचा दर ९.६ टक्क्यांवर गेला आहे. तर ग्रामीण बेरोजगारीचा दर ७.७ टक्क्यांवर गेला आहे. देशातील ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर जुलैमध्ये ६.१ टक्क्यांवरून ऑगस्टमध्ये ७.७ टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे रोजगार दर ३७.६ टक्क्यांवरून ३७.३ टक्क्यांवर घसरला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या