24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयकेंद्रीय मंत्रिमंडळाचा आज होणार विस्तार

केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज होणार विस्तार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे काउंटडाउन सुरू झाले असून, बुधवारी सायंकाळी ६ वाजता मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात ३० नवीन चेह-यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये महाराष्ट्रातील भाजप नेते नारायण राणे यांच्यासह पाच नेत्यांची चर्चा आहे. त्यामध्ये कपिल पाटील, रणजित नाईक निंबाळकर, हिना गावित, प्रीतम मुंडे यांचा समावेश आहे. यापैकी कोणाला संधी मिळते, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राज्यातील दोन केंद्रीय मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्यामध्ये रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे या राज्यमंत्र्यांना नारळ मिळू शकतो, अशी चर्चा आहे. केंद्रात राज्यातील एकूण ६ मंत्री आहेत. त्यात नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर आणि पियूष गोयल हे तीन कॅबिनेट, तर रामदास आठवले, रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे हे राज्यमंत्री आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांना दिल्लीत बोलावून घेण्यात आले असून, मंत्रिमंडळ विस्ताराच्या तोंडावरच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे थावरचंद यांच्याबरोबर इतर काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो. पुढील वर्षी पाच राज्यांत होत असलेल्या निवडणुका लक्षात घेऊन केंद्रात मोठे फेरबदल केले जात आहेत. केंद्र सरकारला २ वर्षे पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असून, यात काही राज्यांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहारला झुकते माप?
मंत्रिमंडळ विस्तार करताना केंद्र सरकार आणि भाजपाकडून उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि इतर निवडणुका असलेल्या राज्यांवर लक्ष्य केंद्रीत केले जाणार आहे. सरकारकडून मोठे फेरबदल करून प्रादेशिक, जातीय आणि राजकीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असे बोलले जात आहे.

ही नावे आघाडीवर
ज्योतिरादित्य शिंदे, सर्वानंद सोनोवाल, नारायण राणे, शांतनू ठाकूर, पशुपती पारस, सुशीलकुमार मोदी, राजीव रंजन, संतोष कुशवाह, अनुप्रिया पटेल, वरुण गांधी, प्रवीण निषाद यांची आणि महाराष्ट्रातून नारायण राणे यांच्यासह हिना गावित, कपिल पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि प्रीतम मुंडे यांच्या नावाचीही चर्चा आहे. नितीश कुमार यांच्या जदयूने चार मंत्रिपदाची मागणी केल्याची माहिती आता समोर आली आहे. यात सुवर्णमध्ये कसा साधणार, याकडे लक्ष लागले आहे.

सार्वजनिक मंडळाकरिता ४ फूट तर घरगुती गणपतीची मुर्ती २ फुटाची

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या