30.8 C
Latur
Monday, January 18, 2021
Home राष्ट्रीय शस्त्रतस्करीसाठी दहशतवाद्यांकडून चीनी ड्रोनचा वापर

शस्त्रतस्करीसाठी दहशतवाद्यांकडून चीनी ड्रोनचा वापर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतात पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांची तस्करी करता यावी, यासाठी पाकिस्तानचा पाठिंबा असलेल्या दहशतवादी संघटना आणि आयएसआयने चीनी बनावटीच्या मोठ्या ड्रोन्सचा वापर सुरु केला आहे. या घडामोडींशी संबंधित लोकांनी ही माहिती दिली. मात्र अशा ड्रोन्सचा वापर सीमेजवळ बॉम्बफेकीसाठी सुद्धा होऊ शकतो, असे अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिले असल्याचे सांगण्यात येत आहे. गेली काही वर्ष आयएसआय आणि दहशतवादी संघटना शस्त्रास्त्रांच्या तस्करीसाठी छोट्या क्षमतेच्या ड्रोन्सचा वापर करत होते. पण आता मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची तस्करी करण्यासाठी त्यांनी अपग्रेडेड नवीन ड्रोन्स खरेदी केली आहेत, अशी माहिती दिल्लीतील दहशतवाद विरोधी पथकातील अधिका-यांनी ही माहिती दिली.

प्रत्यक्ष घुसखोरी करणे अवघड
एलओसीवरील डोंगररांगावर बर्फ साचल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना सहजासहजी घुसखोरी करता येत नाही. पाकिस्तानातील दहशतवादी संघटना ड्रोन्सच्या माध्यमातून पंजाबमध्ये शस्त्रास्त्रे टाकतात. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले करण्यासाठी सीमेपलीकडून ही शस्त्रास्त्रे पाठवली जातात,असे वेगवेगळया गुप्तचर अहवालातून हे समोर आले आहे.

पंजाबमध्ये दहशतवाद पूनर्जीवित करण्याचा प्रयत्न
पंजाबमध्ये दहशतवाद पूनर्जीवित करण्यासाठी तेथील शेतकरी आंदोलनात पाकिस्तानातील खलिस्तानी गटांनी शिरकाव केल्याचे अहवाल आहेत. राज्य पोलिसांकडून या धोक्याबद्दल केंद्र सरकार आणि सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. शस्त्रास्त्र पोहोचवण्यासाठी चिनी ड्रोन्सचा वापर याच्यापेक्षा वजन वाहून नेण्यासाठी सक्षम असलेल्या ड्रोन्सचा सीमेजवळ बॉम्बफेकीसाठी सुद्धा वापर होऊ शकतो, याबद्दल गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा दलांना सतर्क केले आहे.

पाकिस्तानी आयएसआय कडून दहशतवाद्यांना प्रोत्साहन
स्वस्तातले ड्रोन वापरुन बॉम्ब हल्ला करता येतो, त्यामुळे आयएसआय दहशतवादी संघटनांना अशा मार्गाने हल्ले करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. आयएसआयने यावर्षी एप्रिल महिन्यात सर्वप्रथम लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या कमांडर्स बरोबर झालेल्या बैठकीत या रणनितीवर चर्चा केली होती. त्यानंतर महिन्याभरानंतर पीओकेमधील कोटली जिल्ह्यातील मुख्यालयात याबद्दल चर्चा झाली. इंटेलिजन्स एजन्सीने ही माहिती दिली आहे.

कोचर यांना दिलासा नाहीच

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या