21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeराष्ट्रीयपुढील महिन्यात लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता

पुढील महिन्यात लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये कोरोना लसीच्या वापराला मंजुरी दिल्यानंतर संपूर्ण जगाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता भारतात कोरोना लस कधी मिळणार, याची प्रतीक्षा सर्वांना आहे. दरम्यान यूकेपाठोपाठ आता भारतातही लवकरच कोरोना लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीतील एम्सने ही मोठी माहिती दिली आहे.

भारतात सध्या ज्या कोरोना लसींचे ट्रायल सुरू आहे़ त्या लसींना याच महिन्यात किंवा पुढील महिन्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. आपात्कालीन वापरासाठी या लसींना परवानगी दिली जाऊ शकते. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले, भारतात काही लसी क्लिनिकल ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. या वर्षाच्या अखेरला किंवा पुढच्या महिन्याच्या सुरुवातीलाच या लसीच्या आपात्कालीन वापराला परवानगी मिळण्याची आशा आहे.

८० हजार जणांची चाचणी पुर्ण
लस सुरक्षित आहे याचा पुरेसा डेटा उपलब्ध आहे. लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकता याच कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. ७०,०००-८०,००० लोकांना लस देण्यात आली. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम दिसून आले नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

आंदोलनकर्त्या शेतक-यांची होणार कोरोना चाचणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या