22.9 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeराष्ट्रीयवाधवान बंधूंचा जामीन फेटाळला

वाधवान बंधूंचा जामीन फेटाळला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या वेळी कोर्टाच्या कामावर परिणाम झाला आहे. कोर्टाचे बहुतेक काम ऑनलाइन केले जात असून कोर्टाच्या खटल्यांची सुनावणी संथ आहे. डीफॉल्ट बेल न येण्याच्या घटनांमध्ये वेगाने वाढ होत आहे. येस बँक घोटाळ्यातील आरोपी डीएचएफएलचे माजी प्रमोटर धीरज आणि कपिल वाधवान बंधुंना जामीन नकारण्यात आला.

कोरोना साथीच्या संकटामध्ये डीफॉल्ट बेल न मिळाल्याने वकीलांच्या अडचणी वाढल्या आहेत. वाधवान बंधू, दीपक कोचरपासून छोट्या मोठ्या कोर्टातील प्रकरणामध्ये डिफॉल्ड बेल मिळत नाही. हा एक वादाचा मुद्दा आहे. कोरोना साथीच्या प्रादुर्भावादरम्यान गुन्हेगारी प्रकरणांमध्ये तपास यंत्रणांकडून चौकशीला उशीर झाला आहे. तर इतर काही प्रकरणांमध्ये कोर्टाकडून डीफॉल्ट जामीन मिळविणे न्यायालयांचे समाधान करणे कठीण होत आहे.

काय असते डिफॉल्ट बेल ?
सीआरपीसीच्या कलम १७७ (२) अन्वये तपास यंत्रणांचा तपास पूर्ण न झाल्यास किंवा १० वर्षांहून अधिकची शिक्षा मिळाली असल्यास, ६० दिवसात चार्जशीट दाखल न केली गेल्यास आरोपीला डिफॉल्ट जामीन देण्यात येतो.

कोरोनाच्या नावाखाली जबाबदारी झटकू नका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या