21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयपावसामुळे कोसळली घराची भिंत; ७ मुले ढिगाऱ्याखाली दबली, दोघांचा मृत्यू

पावसामुळे कोसळली घराची भिंत; ७ मुले ढिगाऱ्याखाली दबली, दोघांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

अलिगड : बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत पावसामुळे कोसळल्याने सात मुले ढिगाऱ्याखाली दबली गेली. यात दोन मुलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. सध्या सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. ही घटना उत्तर प्रदेशातील अलिगड जिल्ह्यातील हुसेनपूर शहजादपूर परिसरात शनिवारी (ता. ३०) दुपारी घडली.

हुसैनपूर शहजादपूर येथे घर बांधले जात आहे. जवळच शाळेतून परतलेली मुले घरी जात असताना अचानक बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत कोसळली. कोणाला समजेपर्यंत ७ निष्पाप मुले ढिगाऱ्याखाली दबले गेले. हे पाहून स्थानिक नागरिकांनी घाईघाईने ढिगारा हटवण्याचे काम सुरू केले व पोलिस प्रशासनाला माहिती दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या