32.6 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeराष्ट्रीयसंपूर्ण गावच ‘कोरोना पॉझिटीव्ह’

संपूर्ण गावच ‘कोरोना पॉझिटीव्ह’

एकमत ऑनलाईन

सिमला : हिमाचल प्रदेशमधील लाहौल खो-यातील एक संपूर्ण गावच कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. थोरांग गावातील ५२ वर्षीय भूषण ठाकूर या एकमेव नागरिकाला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही.

लोकसंख्येच्या प्रमाणानुसार लाहौल-स्पिती हा जिल्हा राज्यातील सर्वाधिक करोनाबाधितांचा जिल्हा ठरला आहे.लाहौलमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत अचानक मोठी वाढ झाल्याने स्थानिक प्रशासनातील अधिक-यांनी पर्यटकांना येण्यास बंदी घातली आहे.

रोहतांग बोगद्याच्या उत्तरेकडील बाजूस हा सर्व प्रदेश आहे. बोगद्याच्या नंतरच्या प्रदेशात असणा-या गावांमध्ये कोणत्याही पर्यटकास प्रवेश देण्यात येत नसून हा संपूर्ण परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

देशाला विभागण्यासाठी भाजपकडून लव्ह जिहाद शब्दाची निर्मिती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या