24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeराष्ट्रीयहिवाळी अधिवेशन नव्या संसद भवनात होणार

हिवाळी अधिवेशन नव्या संसद भवनात होणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : संसदेच्या नवीन इमारतीत हिवाळी अधिवेशन सुरू करण्याचा प्रयत्न आहे. नव्या इमारतीत आत्मनिर्भर भारताचे चित्र स्पष्टपणे दिसेल. तांत्रिक आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही नवी इमारत जुन्या संसद भवनाच्या खूप पुढे आहे. जुनी इमारतदेखील त्याचा एक भाग असेल असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले.

आता सभागृह रात्री उशिरापर्यंत चालते. मी वेळोवेळी पक्षाच्या नेत्यांशी बोलतो. त्यांना सांगतो की सभागृह सुरळीत चालले पाहिजे. शिस्त आणि सभ्यता राखली गेली पाहिजे, असेही बिर्ला म्हणाले. लोकसभा सचिवालय खासदारांसाठी सूचीबद्ध विधेयकांवर तज्ज्ञांच्या वतीने ब्रीफिंग सत्र आयोजित करीत आहे. संशोधनावर आधारित माहितीही खासदारांना दिली जाते. वाचनालय अधिक चांगले व्हावे यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले आहे. आता खासदारांसाठी घरपोच पुस्तकांचा पुरवठाही सुरू करण्यात आल्याचे बिर्ला यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या