कोलकाता : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यातील पार्थ चॅटर्जीवर महिलेने चप्पल फेकल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी महिलेने कॅश किंग पार्थ चॅटर्जी यांच्यावर चप्पल फेकली. हा नेता जनतेचा पैसा लुटतो असे यावेळी महिला म्हणाली.
याआधी रविवारी पार्थ चॅटर्जी यांनी दावा केला होता की, ईडीच्या छाप्यादरम्यान जप्त केलेले पैसे त्यांचे नव्हते. आपल्या विरोधात कोण षडयंत्र रचत आहे हे येणारा काळच सांगेल असेही ते म्हणाले होते. याआधी पार्थ चॅटर्जीची मदतनीस अर्पिता मुखर्जी हिने ही रोख पार्थ चॅटर्जीची असल्याचे सांगितले होते. या दोघांनीही नकार दिल्यानंतर सापडलेली मालमत्ता कोणाची, हा मोठा प्रश्न केंद्रीय यंत्रणेसमोर आहे.