वाराणसी : वाराणसीतील गोवर्धन पुरी मठाचे पीठाधीश्वर जगतगुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी अल्लाह हा शब्द मातृशक्तीची आराधना करण्याचा असल्याचे म्हटले आहे. हा शब्द मुळ संस्कृत शब्द आहे. अल्लाह हा शब्द माँ दुर्गाला आवाहन करण्यासाठी वापरला जातो.
अल्लाह आणि ओम एकच असे वक्तव्य करणारे जमियत उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना सय्यद अर्शद मदनी यांच्या विधानाला उत्तर देताना शंकराचार्यांनी या गोष्टी सांगितल्या. शंकराचार्य स्वामी निश्चलानंद म्हणाले की, धर्मावर प्रश्न उपस्थित करणा-यांनी आधी संस्कृत-व्याकरणाचा अभ्यास करावा. आपल्या सर्वांचे पूर्वज सनातनी वैदिक आर्य होते.