राजकोट : उन, पाऊस असो कडाक्याची थंडी या वातावरणात व्यक्तीला आठ वर्ष एकाच झाडाला बांधून ठेवल्यास त्याची काय अवस्था होईल?, ही कल्पना करुनच आपल्या अंगावर काटा येतो. मात्र, गुजरातमधल्या राजकोट जिल्ह्यात असाच एक प्रकास उघडकीस आला असून २२ वर्षीय मुलगा मानसिक रोगी असल्याने त्याला आठ वर्षांपासून झाडाला बांधून ठेवण्यात आले होते. २२ वर्षांचा महेश आठ वर्षांपूर्वी अचानक आक्रमक झाला. त्याने दुस-यावर हल्ला, दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे महेशच्या कुटुंबीयांनी त्याला नग्नावस्थेत झाडाला बांधून ठेवले.