24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयताडपत्रीची चोरी; सुवेंदू अधिकारीविरूध्द गुन्हा

ताडपत्रीची चोरी; सुवेंदू अधिकारीविरूध्द गुन्हा

एकमत ऑनलाईन

कोलकाता : पश्चिम बंगाल सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील वाद नवा नाही. अनेक दिवसांपासून सुरु असलेला वाद दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे. आता विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पराभूत करणा-या सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यास चक्रीवादळातील पीडितांना देण्यासाठी आणलेले साहित्य चोरल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. कोंटाई नगरपालिकेच्या व्यवस्थापन मंडळ सदस्य असलेल्या रत्नदीप मन्ना यांनी याबाबतची लेखी तक्रार दिली आहे. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीत नोंद केल्याप्रमाणे २९ मे रोजी हिमांशू मन्ना आणि प्रताप डे नावाच्या व्यक्तींनी नगरपालिकेच्या गोदामातून ताडपत्रींचा एक ट्रक चोरून नेला आहे. या प्रकरणात सुवेंदू अधिकारी आणि त्यांचे बंधू सौमेंदू अधिकारी याचा हात असल्याचा आरोप करण्यात आहे. यासाठी त्यांनी केंद्रीय सुरक्षा दलाची मदत घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुवेंदू अधिकारी, सौमेंदू अधिकारी, ंिहमाशू मन्न आणि प्रताप डे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर प्रताप डे याला अटक करण्यात आली असून, त्याची चौकशी सुरु केली आहे. मदत साहित्य नंदीग्राममधील यास चक्रीवादळात पीडितांना वाटण्यासाठी घेऊन गेल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

‘घर घर राशन’ योजनेवरून खडाजंगी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या