छिंदवाडा : ंिछंदवाड्याचे आयुर्वेदाचार्य डॉ. प्रकाश टाटा यांनी छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामचा कथित धर्मगुरू धीरेंद्र शास्त्रीला खुले आव्हान दिले आहे. धीरेंद्र शास्त्री मनातली गोष्ट चिठ्ठीवर लिहिल्याचा जो दावा करतोय, तो सिद्ध झाल्यास एक कोटी रुपये देऊ असे आव्हान त्यांनी दिले आहे.
छिंदवाडा येथील सिल्व्हर शाइन हॉटेलमध्ये पत्रकारांसमोर हा मोठा दावा करताना डॉ. टाटा यांनी थेट धीरेंद्र शास्त्रीवर आरोप केले आहेत. ते म्हणाले पंडित धीरेंद्र शास्त्रीचे खरंच काही कर्तृत्व असेल तर त्याने माझ्याकडून लिहिलेल्या स्लिपमध्ये काय लिहिले आहे ते सांगावे, ते खरे असेल तर मी त्यांना एक कोटी रुपये देईन.
हे खुले आव्हान केवळ पंडित धीरेंद्र शास्त्रीलाच नाही तर देशभरात पसरलेल्या सर्व बाबांसाठी आहे, मग तो कोणत्याही धर्माचा असो. या सर्व गोष्टींना नुसत्या दिखाव्यासाठी असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले असे काहीही होऊ शकत नाही. जगात देव नाही. हे सर्व सेंिटगद्वारे पैसे कमविण्याचे साधन आहे. मला ग्रामीण भागात बसवले असले तरी दिखाऊपणाच्या माध्यमातून लाखोंची गर्दी जमवता येते. ते म्हणाले की माझा धर्मावर पूर्ण विश्वास आहे पण लोक जे काही करत आहेत ते फक्त दिखावा आणि पैसे कमविण्याचा एक सोपा मार्ग आहे.