नवी दिल्ली : दिल्लीतील राजपथावर यंदा प्रजासत्ताक दिनी होणाºया परेडमध्ये मोटारसायकल स्टंट होणार नाही. राजपथावरील सैनिकांचा मोटारसायकल स्टंट हे परेडचे प्रमुख आकर्षण असते. मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा स्टंटचा कार्यक्रम घेतला जाणार नसल्याचे सूत्रांनी शनिवारी सांगितले.
कोरोना संकटामुळे परेड पाहण्यासाठी फक्त २५ हजार लोकांना पासेस दिले जाणार असून, शौर्य पुरस्कार विजेते तसेच अतुलनीय धाडस दाखवून इतरांचा जीव वाचविणाºया मुलांनाही राजपथावरील कार्यक्रमात सहभागी करून घेतले जाणार नाही. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र ब्रिटनमध्ये कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावल्याने जॉन्सन यांनी भारतात येण्यास असमर्थता दर्शविली होती. त्यामुळे प्रमुख पाहुण्याशिवाय प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे.
सामाजिक दूरत्वाची गरज लक्षात घेऊन राजपथावर प्रेक्षकांसाठीच्या खुर्च्या लांब-लांब ठेवल्या जाणार आहेत. राजपथावरील प्रेक्षक क्षमता सव्वा लाख इतकी आहे. तथापि केवळ २५ हजार पासेसचे वाटप करण्यात आले आहे. प्रसारमाध्यमांसाठी दिल्या जाणाºया पासेसची संख्याही कमी करण्यात आली आहे. १७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची ३२ चित्ररथे परेडमध्ये सामील होतील. दरवर्षी चित्ररथे लाल किल्ल्यावरून निघतात. यंदा ती राष्ट्रीय संग्रहालयापासून निघतील.
रहाणेने कसोटी संघाचे नेतृत्व करावे