नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे ऑनलाइन व्यवहारांमध्ये कमालीची भर पडली आहे. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या (युपीआय) माध्यमातून पेमेंट करण्याला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, युपीआय पेमेंट््सवर १ जानेवारी २०२१ पासून अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र तसे होणार नसल्याचा खुलासा नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) केला आहे.
१ जानेवारी २०२१ पासून युपीआयच्या माध्यमातून होणा-या व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. चुकीच्या आणि खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नये. सोप्या पद्धतीने युपीआय व्यवहार सुरू ठेवा, असे आवाहन एनपीसीआयकडून निवेदन जारी करुन करण्यात आले आहे. या स्पष्टीकरणानंतर युपीआयद्वारे व्यवहार करणा-या कोट्यवधी युझर्सना दिलासा मिळाला आहे. या विनामूल्य सेवेचा वापर करता येणार आहे.
थँक गॉड ! अजून माणुसकी जिवंत आहे