22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeराष्ट्रीयतिसरी लाट येण्याचा कोणताही पुरावा नाही

तिसरी लाट येण्याचा कोणताही पुरावा नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना प्रादुर्भावाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी ती कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिअंटमुळे येईल याबाबतचा कोणताही पुरावा नसल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. इन्स्टिटयूट ऑफ जीनोमिस्क अँड इंटीग्रेटिव्ह बायोलॉजीचे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. त्यामुळे तिस-या लाटेपेक्षा सध्या दुस-या लाटेकडेच लक्ष देऊन कोरोना संदर्भातील सर्व प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्यावर भर द्यायला हवे, असे म्हटले आहे.

कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिअंट आणि संभाव्य तिसरी लाट याचा काहीच संबंध नाही. तसा कोणताही पुरावा मिळालेला नाही, असेही डॉ. अग्रवाल म्हणाले. त्यांच्या संस्थेने महाराष्ट्रात जून महिन्यात ३,५०० हून अधिक नमुन्यांचे परीक्षण केले आहे. यात एप्रिल आणि मे महिन्यात घेण्यात आलेल्या नमुन्यांचाही समावेश होता. डेल्टा प्लस व्हेरिअंटचा धोका वाढतोय हे नक्की आहे. पण याचे रुग्ण एक टक्क्यापेक्षाही कमी असतील, असेही ते म्हणाले.

देशात ४० हून अधिक डेल्टा प्लसचे रुग्ण
देशात सध्या डेल्टा प्लस व्हेरिअंटचे ४० रुग्ण आढळून आले आहेत. पण यामुळे घाबरुन जाण्याचे कारण नसल्याचे डॉ. अनुराग अग्रवाल म्हणाले. ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या अधिक आढळून आली आहे तिथे खूप जास्त प्रसार झाल्याचे आढळून आलेले नाही. परिस्थिती नियंत्रणात आहे. सराकारने महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांना डेल्टा प्लस व्हेरिअंटबाबत तात्काळ नियंत्रणासाठीची पावलं उचलण्याचे आदेश दिलेले आहेत.

धोका नाही मात्र गाफिल राहु नका
खूप मोठा धोका सध्या दिसत नसला असे असले तरी याचा अर्थ गाफील राहणे असा होत नाही. देशात आज दुस-या लाटेचा प्रभाव असूनही आहे. त्यामुळे दुसरी लाट संपुष्टात येईल यासाठी आधी प्रयत्न सुरूच ठेवायला हवेत. त्यासाठी आपण चिंता बाळगली पाहिजे, असे डॉ. अनुराग अग्रवाल म्हणाले

काँग्रेस पक्षश्रेष्ठी-अशोक गेहलोत यांच्यात दुरावा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या