36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeराष्ट्रीयकोरोनात केंद्राकडून आर्थिक मदत नाही

कोरोनात केंद्राकडून आर्थिक मदत नाही

एकमत ऑनलाईन

कोलकाता : कोरोना संकटकाळात केंद्र सरकारकडून कुठलीच आर्थिक मदत मिळाली नाही, असा दावा पश्चिम बंगाल सरकारने दिली आहे. राज्य सरकारने आतापर्यंत ४ हजार कोटी रुपये खर्च केल्याचेही सरकारने म्हटले आहे. महिला व बालविकास मंत्री शशी पंजा म्हणाल्या की, राज्य सरकारनेच कोरोना संकटकाळात खर्च केला. केंद्राकडून कुठलीच मदत मिळाली नाही.

राज्य सरकारने आतापर्यंत चार हजार कोटी रुपये खर्च केले. सरकारने जूनपर्यंत १२०० कोटी रुपये आणि त्यानंतर २८०० कोटी रुपये खर्च केले आहेत. मंत्री पंजा म्हणाल्या की, अम्फान वादळामुळे राज्याचे एक लाख कोटीहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. वादळातून झालेल्या नुकसान आणि बचाव कार्यासाठी राज्याने आतापर्यंत ६ हजार ५०० कोटी खर्च केल्याचे त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे केंद्र सरकारने काहीच आर्थिक मदत केली नसल्याचे पंजा यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारकडून ५० हजार कोटी येणे आहेत ते सुद्धा केंद्र सरकारने दिले नसल्याचे पंजा यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारमुळेच जिल्ह्यातील प्रकल्प रखडले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या