25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeराष्ट्रीयपरदेशातून येणा-या मदतीवर आयजीएसटी नाही; ३० जूनपर्यंत राहणार सूट

परदेशातून येणा-या मदतीवर आयजीएसटी नाही; ३० जूनपर्यंत राहणार सूट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मोदी सरकारने कोरोनाच्या संकटात दिलासा देण्यासाठी कोविडशी संबंधित मदत सामग्रीवर वस्तू आणि सेवा करातून (आयजीएसटी) सूट जाहीर केली आहे. वित्त मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोविड १९ च्या मदतीसाठी सरकारला आयजीएसटीमधून सवलत देण्यात आली आहे. अनेक दानशूर संस्था, कॉर्पोरेट संस्था आणि इतर संस्था/भारताबाहेरील संघटनांकडून देशात आयजीएसटीतून सवलत देण्याची विनंती केली होती.

या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने देशातील विनामूल्य वितरणासाठी आयात आणि विनाशुल्क कोविड मदतीच्या सामग्रीला आयजीएसटीतून सूट दिली आहे. ही सूट ३० जूनपर्यंत लागू राहणार आहे. तत्पूर्वी सीमा शुल्काला बंदरांवर मंजुरी न मिळाल्यामुळे आतापर्यंत वस्तूंवरची ही सूट धूळखात पडून होती. सरकारने यापूर्वीच रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि त्यामध्ये वापरल्या जाणा-या मुख्य रसायने (एपीआय), चिकित्सा स्तरावरील ऑक्सिजन, ऑक्सिजन संयोजक, क्रायोजेनिक ट्रान्सपोर्ट टँक आणि कोविड लसी यांसारख्या वस्तूंच्या आयातीवरील सीमा शुल्कात सूट जाहीर केली आहे.

कोणास सूट मिळणार?
मदत सामग्रीच्या विनामूल्य वितरणासाठी आयजीएसटी सवलत नोडल ऑथोरिटी, अधिकृत संस्था, मदत एजन्सी किंवा राज्य सरकारद्वारे नियुक्त केलेल्या वैधानिक मंडळाच्या मंजुरीवर अवलंबून असेल. देशात कोरोना संसर्गाच्या वाढत्या घटनांमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मते, कोविड संसर्गाची सोमवारी ३.६८ लाख प्रकरणे नोंदली गेली, तर ३,४१७ लोकांचा मृत्यू. गेल्या आठवड्यात दररोज संसर्गाची प्रकरणे ४ लाखांच्या वर गेली.

चीनमुळे जगापुढे आणखी एक संकट; रॉकेटवरील नियंत्रण सुटले कधीही, कुठेही कोसळणार?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या