24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीय‘त्या’ मृतदेहांची एसआयटी चौकशी नाही

‘त्या’ मृतदेहांची एसआयटी चौकशी नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गंगा नदीत मृतदेह टाकण्याच्या प्रकरणात एसआयटी चौकशीसाठी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. प्रदीपकुमार यादव यांनी या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणात सुनावणी घेण्यास नकार दिला. न्यायालयाने म्हटले की, आम्ही जनहित याचिका म्हणून हे ऐकण्यास सहमती देत नाही. सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यास संबंधित प्राधिकरणाकडे जाण्यास सांगितले. याचिकाकर्ता प्रदीप यादव यांनी याचिकेत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली होती.

बिहार आणि उत्तर प्रदेशातील गंगा नदीत मृतदेह सापडल्याची घटना सर्वोच्च न्यायालयात पोहोचली होती. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यामध्ये बिहारमधील बक्सरमधील गंगा आणि यूपीमधील गाझीपूर आणि उन्नाव येथे मृतदेह सापडल्याच्या घटनांची चौकशी करण्याची मागणी विशेष तपास यंत्रणेमार्फत करण्यात आली. या प्रकरणात पुढील तपास करण्यासाठी सर्व मृतदेह बाहेर काढले पाहिजेत आणि त्यानंतर त्यांचे शवविच्छेदन केले पाहिजे, असेही म्हटले होते.

प्रशासनाने खोटी कारवाई केली
वकील प्रदीपकुमार यादव यांनी याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात अपयशी ठरलेल्या अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. प्रदीप व इतरांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, गंगा नदीत सुमारे १०० मृतदेह सापडले आहेत. त्यापैकी ७० लोकांना बिहारमधील बक्सरमध्ये आणि ३० जणांना उत्तर प्रदेशात बाहेर काढण्यात आले.

मुलांच्या लसीकरणानंतरच शाळा सुरू होण्याची शक्यता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या