32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeराष्ट्रीयअखंड भारताशिवाय उपखंडात स्थिरता नाही - मोहन भागवत

अखंड भारताशिवाय उपखंडात स्थिरता नाही – मोहन भागवत

एकमत ऑनलाईन

हैद्राबाद : भारत जेव्हा अखंड होता तेव्हाच तो शांत ,स्थिर व आर्थिक दृष्ट्या समृद्ध होता. गेल्या काही दशकांत व शतकांत जे भाग भारतापासून तुटून गेले ते कधीच स्थिर होऊ शकले नाहीत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. हैद्राबादमध्ये एका पुस्तकाचे प्रकाशन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

गांधार प्रांताचे अफगाणिस्तान झाले, मात्र ते कायमच अशांत राहीले आहे. गेल्या ४० वर्षांत तर सतत युद्धग्रस्त राहिल्याने त्या देशाचा विकासच ठप्प आहे. ७० वर्षांखाली वेगळे झालेला पाकिस्तानही कायम दरिद्रीच राहिला आहे. बांग्लादेशाचीही अवस्था काही फार चांगली नाही, असे भागवत यांनी नमूद केले. त्यामुळे या सर्व देशांना स्वत:चा व नागरिकांचा शाश्वत विकास साधायचा असेल तर भारताशी पुन्हा जोडले जाण्यात त्यांचेच भले होईल किंबहूना सद्यपरिस्थिती पाहता ही भारतापेक्षाही त्यांच्यासाठीच अधिक गरजेची बाब असल्याचेही भागवत यांनी नमूद केले.

अखंड भारतामुळे जागतिक शांतताही येईल
अखंड भारताची निर्मिती केवळ या भागासाठीच लाभदायक ठरणार आहे, असे नाही तर संपुर्ण जगातील शांततामय जीवनासाठीही त्याची गरज आहे. असेही त्यांनी सांगितले. भागवत यांच्या या वक्तव्यामागे जागतिक दहशतवादाला अफगाणिस्तान व पाकिस्तानमधील अनागोंदीच कारणीभूत ठरत असल्याचे विविध जागतिक विचारवंताच्या मतांचा संदर्भ होता.

भारत बळजबरी करणार नाही
भारत आपल्या शेजारी देशांना जोडण्यासाठी बळजबरी किंवा दबाव तंत्राचा वापर करणार नाही. मात्र सनातन धर्माच्या समान धाग्यावर आम्ही त्यांना जोडण्याचा प्रयत्न करु,असेही भागवत यांनी यावेळी सांगितले.

नांदेड जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा चोविस हजाराच्या दारात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या