30.8 C
Latur
Monday, January 18, 2021
Home राष्ट्रीय देशभरात लसीकरण नाही

देशभरात लसीकरण नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात कोरोनाने कहर केला असून, आगामी काळात आणखी वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे़ अशातच सरकारने देशभरात लसीकरण करण्यात येणार असल्याचे म्हटलेच नसल्याचा खुलासा अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे(आयसीएमआर)चे अध्यक्ष बलराज भार्गवा यांनी मंगळवार दि़ १ डिसेंबर रोजी केल्याने खळबळ उडाली आहे.

एकीकडे निवडणुकीच्या काळात देशभरात मोफत लस पुरविण्याची भाषा करणा-या केंद्र सरकार आणि काल परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे येथील सिरम इंस्टिट्यूटला भेट दिल्यानंतर सिरमने देशातील नागरिकांना परवडेल अशा किंमतीत लस उपलब्ध होणार असल्याचे म्हटले आहे़ यावरून केंद्र सरकारकडून लसीबाबत नागरिकांप्रति गंमतीचा प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची आज पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला आयसीएमआरचे अध्यक्ष बलराम भार्गवा आणि केंद्रीय आरोग्य सचिव उपस्थित होते. यावेळी केंद्रीय आरोग्य सचिवांना देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी किती वेळ लागेल याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लस महत्त्वाची असल्याची चर्चा कित्येकी महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष कोरोनाची लस कधी येणार, याकडे लागले आहे.

आरोग्य सचिवांचाही सुरातसुर
देशभरात लसीकरण करण्यात येईल, असे सरकारने कधीही म्हटलेले नाही. त्यामुळे आपण केवळ वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारावरच अशा वैज्ञानिक विषयांवर चर्चा करायला हवी, हे महत्त्वाचे आहे, असे आरोग्य सचिव म्हणाले.

साखळी तुटली तर, लसीची गरज नाही
आरोग्य सचिवांनंतर आयसीएमआरचे भार्गवा यांनी लसीकरणाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, आपले उद्देश कोरोनाची साखळी तोडण्याचा आहे. त्यामुळे लसीकरण लसीच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असणार आहे. जर आपण गंभीर लोकांचे लसीकरण करण्यास आणि विषाणू प्रसाराची साखळी तोडण्यात यशस्वी ठरलो, तर आपल्याला देशातील संपूर्ण लोकसंख्येला लस देण्याची गरज नाही, असे भार्गवा यांनी यावेळी स्पष्ट केले.

व्यावसायिक गॅस सिलिंडर दरात ५५ रु़ची वाढ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या