32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeराष्ट्रीयदेशात दोन दिवस लसीकरण नाही

देशात दोन दिवस लसीकरण नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशभरात कोरोना विषाणूविरोधात लसीकरण मोहिम १६ जानेवारीपासून सुरु आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी व मग अत्यावश्यक सेवेतील लोक असे लसीकरण करण्यात आले. १ मार्चपासून ६० वर्षांपासून पुढील व ४५ वर्षांवरील गंभीर व्याधीग्रस्त नागरिकांना लस देण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी कोविन अ‍ॅपची नोंदणी क्षमता वाढविण्यासाठी शनिवार २७ फेब्रुवारीपासून रविवारी २८ फेब्रुवारीपर्यंत २ दिवस लसीकरण मोहिम स्थगित केल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्यावतीने देण्यात आली आहे.

देशात १६ जानेवारीपासून शुक्रवार (दि.२७ फेब्रुवारी) पर्यंत १ कोटी ३५ लाखांपर्यंत नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. १ मार्चपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु होणार आहे. तिसºया टप्प्यात ६० वर्षांवरील सर्व नागरिकांना तसेच ४५ वर्षांवरील गंभीर व्याधीग्रस्त नागरिकांना लस देण्यात येणार आहे. लसीकरणासाठी या नागरिकांना प्रथम शासनाच्या कोविन अ‍ॅपवर नोंदणी करावी लागणार आहे. आतापर्यंत झालेल्या सर्वच लसीकरणाची नोंद कोविन अ‍ॅपवर केलेली आहे. त्यामुळे केंद्रसरकारला लसीकरणाच्या कार्यक्रमाच्या प्रगतीची सद्यस्थिती जाणून घेऊन गतीमान व प्रभावी लसीकरणासाठी आवश्यक सुधारणा करता येणे शक्य होते.

तिस-या टप्प्यातील लाभार्थींची संख्या खूप मोठी
आता तिस-या टप्प्यात होणा-या लसीकरणातील सहभागी लोकांची संख्या ही खूपच मोठी असल्याने त्यांच्या इतक्या मोठ्या प्रमाणात नोंदीची सोय सद्यस्थितीतील कोविन अ‍ॅपमध्ये नाही. त्यामुळे अ‍ॅपमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यासाठी दोन दिवस लसीकरण करण्यात येणार नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या