नवी दिल्ली : पेट्रोल व डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर सियामने सरकारला सीएनजीच्या किमती कमी करण्याची, स्टील आणि प्लास्टिक उत्पादनांच्या काही कच्च्या मालावरील आयात शुल्क कमी करण्याची विनंती केली. त्यामुळे सीएनजीचे दर कमी होऊ शकतात. ऑटो उद्योग पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याच्या निर्णयाचे स्वागत करतो. या निर्णयामुळे महागाईचा ताण कमी होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, असे सियामने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना ट्विटरवर टॅग करीत लिहिले. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने (सियाम) देखील सीएनजीच्या दरात कपात करण्याची विनंती केली.