जयपूर : योगगुरू बाबा रामदेव ठाण्यात महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. भारतीय संस्कृतीत जातीच्या आधारावर कधीही भेदभाव केला गेला नाही. स्त्री-पुरुष असा भेदभाव कधीच नव्हता. कधीही मोठे होण्याचा विचार करू नका, तर मोठे करण्याचा विचार करा. अभाविपच्या कार्यकर्त्यांना यशाचा मंत्र देत ते म्हणाले, वेळेत काम करणे हे यशाचे सर्वात मोठे सूत्र आहे.
पतंजलीच्या मोफत योग शिबिरात बोलत असताना बाबा रामदेव म्हणाले, महिला साडीमध्ये छान दिसतात, सलवार-सुटमध्येही (पंबाजी ड्रेस) छान दिसतात. आणि माझ्या नजरेने पाहिले तर, काही घातले नाही तरी छान दिसतात असे त्यांनी वक्तव्य केले होते. आता योगगुरू बाबा रामदेव यांनी देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याची मागणी केली.
राजस्थानची राजधानी जयपूर इथे झालेल्या अभाविपच्या राष्ट्रीय अधिवेशनात बाबा रामदेव यांनी ही मागणी केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ६८ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन करताना रामदेव म्हणाले, भारताला आर्थिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध व्हायचे आहे. भारतात जन्माला येऊन काही लोक कम्युनिस्ट समाजवादाच्या बाता करतात. त्या कम्युनिस्टांनी चीन आणि उत्तर कोरियात जावे असे त्यांनी सांगितले.