22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeराष्ट्रीयभविष्यात फास्टॅगची गरज राहणार नाही : नितीन गडकरी

भविष्यात फास्टॅगची गरज राहणार नाही : नितीन गडकरी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशवासीयांना अनावश््यक टोलपासून मुक्ती मिळावी यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करण्याच्या पर्यायावर केंद्र सरकारचे वेगाने काम सुरू आहे.

नजिकच्या काळात महामार्गांवर उपग्रहाद्वारेच परस्पर टोल वसुली आणि तीही त्या गाडीच्या मालकाच्या बॅँक खात्यातून व्हावी या धर्तीवरील एक अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याचा विचार सुरू आहे आणि त्यामुळे भविष्यात फास्टॅगची गरज भासणार नाही, असे रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत सांगितले.

आगामी तीन वर्षांत म्हणजेच २०२४ संपण्याआधी भारतातील रस्त्यांचे पायाभूत सुविधांचे जाळे अमेरिकेचाही मुकाबला करेल, अशी घोषणा गडकरी यांनी केली.

टोलपासून नागरिकांना मुक्तता देण्यासाठी नवीन प्रणालीची नजीकच्या काळात अमलात केली जाईल. यासाठी एक विधेयक आणले जाईल. या प्रणालीत थेट उपग्रहीय तंत्रज्ञानाचाच वापर होणार असल्याने फास्टॅगचीही गरज भविष्यात राहणार नाही. या तंत्रज्ञानात टोल चुकवू शकणार नाही व त्यातून कोणी वाचणारही नाही, असे गडकरी यांनी नमूद केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या