22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeराष्ट्रीयदेशात तिसरी लाट येणार नाही; राकेश झुनझुनवालांचा दावा

देशात तिसरी लाट येणार नाही; राकेश झुनझुनवालांचा दावा

एकमत ऑनलाईन

मुंबई : गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आणि दलाल स्ट्रीटचे तसेच भारताचे वॉरेन बफेट म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांनी भारतामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार नाही, असे मत व्यक्त केले आहे. एका खासगी वाहनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये झुनझुनवाला यांनी, मी तुम्हाला पैजेवर पैसे लावून सांगायला तयार आहे की भारतामध्ये इतक्यात तिसरी लाट येणार नाही, असे म्हटले आहे.

कोरोनाच्या तिस-या लाटेमुळे शेअर बाजारामध्ये मंदी येण्याची भीती गुंतवणूकदारांमध्ये आहे. याचसंदर्भात बोलताना गुंतवणुकदारांनी घाबरण्याची आणि तिस-या लाटेमुळे मंदी येईल यासंदर्भात चिंता करण्याची गरज नसल्याचे झुनझुनवाला यांनी सांगितले आहे. कोणीही दोन लाटांचे भाकित व्यक्त केले नव्हते. मात्र आता सगळेजण तिस-या लाटेची भविष्यवाणी करत आहेत. सध्या ज्या वेगाने लसीकरण सुरु आहे ते पाहता आपल्या सर्वांना हर्ड इम्युनिटी मिळेल. त्यामुळेच तिसरी लाट येण्याची शक्यता मला तरी वाटत नाही, असे झुनझुनवाला यांनी आपले मत मांडताना म्हटले आहे.

अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम नाही
पुढे बोलताना झुनझुनवाला यांनी तिस-या लाटेचा अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही असे मतही व्यक्त केले आहे. मात्र काही बदल करण्याची गरजही झुनझुनवाला यांनी बोलून दाखवली आहे. लाट येवो अथवा न येवो भारतीय अर्थव्यवस्था ही कोणत्याही संकाटाचा सामना करण्यासाठी तयार आहे.

सतर्क राहून काळजी घ्या
तिसरी लाट येणार नाही यासाठी मी पैजेवर पैसे लावण्यासाठीही तयार आहे. सोशल नेटवर्किंगवर सर्वच हुशार लोक तिस-या लाटेची शक्यता व्यक्त करत असल्याने आपण घाबरुन गेलो आहोत. आपण सतर्क राहून काळजी घेतली पाहिजे. मात्र मला वाटत नाही की तिसरी लाट येईल, असे झुनझुनवाला म्हणालेत.

इटली २८ जूनपासून मास्क फ्रि

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या