35.6 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home राष्ट्रीय ‘त्यांनी’ कोवॅक्सीन लस घेऊ नये - भारत बायोटेकचे आवाहन

‘त्यांनी’ कोवॅक्सीन लस घेऊ नये – भारत बायोटेकचे आवाहन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारत बायोटेकने दिलेल्या माहितीनुसार ज्या लोकांना रक्ताशी संबंधित आजार आहे किंवा ब्लड थीनर्सचा त्रास आहे त्यांनी कोवॅक्सीन घेऊ नये, असे म्हटले आहे. सध्या जे आजारी आहेत, ज्यांना मागील काही दिवसांपासून ताप किंवा एखाद्या गोष्टीची ऍलर्जी आहे़ त्यांनी कोवॅक्सीन घेऊ नये, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. गरोदर महिला आणि ब्रेस्ट फींिडंग करणा-या महिला म्हणजेच नवजात बालकांच्या मातांनाही सरकारने लसीकरणाच्या कार्यक्रमातून यापूर्वीच वगळले आहे.

भारत बायोटेकच्या कोरोनावरील कोवॅक्सीन या लसीला ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया म्हणजेच डीसीजीआयने आप्ताकालीन वापरासाठी परवानगी दिल्याबद्दल अनेकांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केल्याचे पहायला मिळाले. या लसीची सुरक्षा, दर्जा, परिणामकारकता आणि माहिती यासंदर्भातील पारदर्शकतेवरुन अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. याचदरम्यान आता भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असणा-या कृष्णा एल्ला यांनी कोवॅक्सीन ही २०० टक्के सुरक्षित असल्याचे म्हटले होते.

आम्हाला लस बनवण्याचा अनुभव असून आम्ही सर्व वैज्ञानिकांचे सल्ले गांभीर्याने घेतो, असेही कृष्णा म्हणाले होते. कोवॅक्सीनच्या प्रतिकूल परिणामांबद्दल म्हणजेच साइड इफेक्टबद्दल बोलताना कृष्णा यांनी कोणालाही इम्यूनो कॉम्प्रोमाइज्ड म्हणजेच रोगप्रतिकारशक्तीसंदर्भातील समस्या किंवा आधीपासून काही आजारांवरील औषध सुरु असतील तर त्यांनी सध्या कोवॅक्सीन घेऊ नये असे सांगितले आहे. भारत बायोटेकने कोवॅक्सीनसंदर्भातील सर्व शंका दूर करण्यासाठी जारी केलेल्या फॅक्टशीटमध्ये यासंदर्भातील माहिती दिली आहे.

यापूर्वी सरकारने इम्यूनो सप्रेसेंट किंवा इम्यूनो डेफिशिएन्सी असणा-या व्यक्तींनाही कोवॅक्सीने घेता येईल असे म्हटले होते़ मात्र चाचण्यांदरम्यान अशा व्यक्तींवर कोरोनाची लस फारशी प्रभावी ठरत नसल्याचे दिसून आले. सामान्यपणे केमोथेरपी करणारे कॅन्सरचे रुग्ण, एचआयव्हीचा संसर्ग झालेले रुग्ण आणि स्टेरॉइडचे सेवन करणारे इम्यूनो-सप्रेस्ड असतात. म्हणजेच अशा व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती खूपच कमी असते.

लस घेतल्यानंतर साईड इफेक्ट दिसल्यास कोवॅक्सीन घेतल्यानंतर कोणालाही कोरोना १९ ची लक्षणे दिसून आली तर त्यांनी आरटी-पीसीआर चाचणी करुन घ्यावी असा सल्लाही भारत बायोटेकने आपल्या फॅक्टशीटमध्ये दिला आहे. आरटी-पीसीआर चाचणीच्या निकालांनाही पुरावा म्हणून कंपनीकडून ग्रा धरले जाणार आहे. आम्ही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे सल्ले दिले आहेत, असेही भारत बायोटेकने स्पष्ट केले आहे. कोरोना लसीकरणानंतरही कोणामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली तर ती खूप सौम्य असतात. कोवॅक्सीनमुळे कोणत्याही प्रकारची ऍलर्जी होत नाही. अशी ऍलर्जी होण्याची शक्यता खूपच कमी आहे. खूपच दुर्मीळ प्रकरणांमध्ये असे होते, असेही भारत बायोटेकने म्हटले आहे़

इतर औषधे घेत असलेल्यांनी माहिती द्यावी
कोवॅक्सीन घेतल्यानंतर काही तासांनंतर तुम्हाला काही साईड इफेक्ट दिसले किंवा कोरोनासारखी लक्षणे आढळून आली़ तर तुम्हाला ज्या व्यक्तीने लस दिली त्याला यासंदर्भातील माहिती द्या. तुम्ही कोरोनाची लस घेण्याआधी किंवा घेतल्यानंतर काही औषधे घेत असाल तर त्याचीही स्पष्ट आणि योग्य माहिती द्यावी, असे नमूद करण्यात आले आहे.

मंगळवारपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या