22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeक्राइमजमावाकडून चोराची हत्या

जमावाकडून चोराची हत्या

एकमत ऑनलाईन

समसमस्तीपूर : चोरीच्या संशयातून जमावाने एकाला पाण्यात बुडवूून लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
बिहारच्या समस्तीपूर येथे ही घटना घडली. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर बिहार पोलिसांनी जमावाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.

समस्तीपूर भागातल्या वैशाली जिह्याच्या सीमाभागातील धमौन गावात ही घटना उघडकीस आली आहे. पटोरी ठाणे हद्दीतील धमौन चिमनीलगत बुधवारी ३ चोर कम्युनिटी सर्व्हिस पॉइंट संचालकांना धमकावून पैसे उकळत होते. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर चोर गोळीबार करत पसार झाले. ग्रामस्थांनी विटा-दगड मारत त्यांचा पाठला केला. चोर स्वत:ला वाचवण्यासाठी पाण्याने भरलेल्या एका शेतात शिरले. पण जमावाने त्यांना पकडले.

याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाच्या तावडीत सापडलेल्या तिघांची सुटका केली. त्यातील एकाचा उपचारादम्यान मृत्यू झाला. हा चोर वैशाली जिह्यातील नयागंज येथील रहिवासी होता. विकास कुमार असे त्याचे नाव असून पिंकेश व रवी यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
धमौन इनायतपूरचे संचालक कुमार व प्रेम कुमार हे बुधवारी सायंकाळी एसबीआयच्या शाखेतून दीड लाख रुपयांची रोकड काढून घरी जात होते. त्यावेळी या ३ चोरांनी त्यांना मारहाण करून रक्कम पळवण्याचा प्रयत्न केला

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या