22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयनाकातून देण्यात येणा-या लसीची तिसरी चाचणी प्रभावी

नाकातून देण्यात येणा-या लसीची तिसरी चाचणी प्रभावी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना दुसरीकडे कोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठे यश हाती आले आहे. भारत बायोटेक कंपनीने कोरोनाच्या बीबीव्ही-१५४ इंट्रानसाल लशीची तिस-या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे. ही लस बुस्टर डोस म्हणून देण्यात येण्याची शक्यता आहे. ही लस नाकावाटे देण्यात येणार आहे.

बीबीव्ही-१५४ इंट्रानसाल लशीची पहिली आणि तिसरी चाचणी पूर्ण करण्यात आली होती. चाचणीदरम्यान, ही लस पहिला आणि दुसरा डोस म्हणून लस देण्यात आली होती. ही लस चाचणी पूर्ण झाल्यानंतर बुस्टर डोस म्हणूनदेखील या लशीची चाचणी करण्यात आली. बुस्टर डोस म्हणून चाचणी करताना ज्यांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशा व्यक्तींवर चाचणी करण्यात आली.

तिस-या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीतील आकडेवारी राष्ट्रीय नियामक प्राधिकरणाकडे पाठवण्यात येणार आहे. पहिल्या डोसच्या चाचणीसाठी अनेक पातळीवर चाचणी करण्यात आली होती. या दरम्यान सुरक्षा आणि इम्युनोजेनेसिटीच्या प्रत्येक पैलूंची तपासणी करण्यात आली होती. याची तुलना कोवाक्सिनोसोबत करण्यात आली. भारत बायोटेकने संपूर्ण भारतात १४ ठिकाणी लस चाचणी केली होती.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यातील चाचणीत निरोगी स्वयंसेवकांना लस देण्यात आली होती. त्यामुळे लशीचा चांगला परिणाम दिसून आला. कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसले नाहीत. ही लस सुरक्षित आणि प्रभावी ठरण्याचे संकेत दिसून आले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या