37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeराष्ट्रीयभारतात तिस-या लसीला मंजुरी?

भारतात तिस-या लसीला मंजुरी?

रशियाची लस, आपत्कालीन वापराचा मार्ग होणार मोकळा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी आणखी एका लसीला आपत्कालीन वापरास मंजुरी मिळू शकते. ही लस रशियातील असून, भारतीय औषध निर्माता कंपनी डॉ. रेड्डीजने ही विकसित केली आहे. या लसीचे नाव स्पुटनिक व्ही असे असून, या लसीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे आपत्कालीन मंजुरीसाठी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीने २१ फेब्रुवारी रोजी भारतीय औषधी महानियंत्रकांकडे(डीसीजीआय) अर्ज केला आहे. त्यामुळे या लसीलाही लवकरच ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीने डीसीजीआयकडे अर्ज केल्यानंतर लगेचच २४ फेब्रुवारी रोजी लसीच्या चाचणीच्या अंतरिम डाटासंदर्भात विचारणा केली होती. त्यामुळे याची पूर्तता केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे यासंबंधी तज्ज्ञांच्या समितीची लवकरच महत्त्वपूर्ण बैठक होऊ शकते आणि त्यासंबंधी निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, याला देशभरातील तज्ज्ञांचा विरोध असून, त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे सरकार यावर निर्णय घेणार का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

देशात संशोधित निकषाच्या आधारावर जानेवारी महिन्यात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली आहे. त्यात भारत बायोटेकच्या लसीला तर तिस-या टप्प्यांतील चाचणी होण्याअगोदरच परवानगी दिली होती. आता २ मार्च रोजी या लसीच्या चाचणीच्या तिस-या टप्प्यातील अहवाल प्राप्त झाला असून, कोव्हॅक्सिन लस ८१ टक्के प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. त्यातच रशियाच्या स्पुटनिक व्हीची तिस-या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे या लसीलाही आपत्कालीन परवानगी मिळू शकते.

तिस-या चाचणीतही प्रभावी ठरली लस
मूळ रशियाची असलेली स्पुटनिक व्ही या लसीच्या तिस-या टप्प्यातील चाचणीही प्रभावी ठरली आहे. यशस्वी ठरण्याचे हे प्रमाण ९१.६ टक्के आहे. तिस-या टप्प्यात रशियात १९ हजार ८६६ लोकांवर चाचणी केली होती. यामध्ये ६० वर्षांवरील १४४ जणांचा समावेश होता. वृद्धांवरदेखील ही लस ९१.८ टक्के प्रभावी ठरल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे भारतात या लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी मिळू शकते.

दुचाकी चोरांची टोळी गजाआड ; ३३ दुचाकी जप्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या